
कळवण, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
- 10 नोव्हेंबर 1980 शेतकरी आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी आज मोहबारी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे हर घर काला झेंडा हर खेत काला झेंडा अभियानाची सुरुवात झाली आहे हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी होणार, अशी माहिती शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली .
10 नोव्हेंबर 1980 साली हुतात्मा शरद जोशी माधवराव तात्या बोरस्ते शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ माधव खंडेराव मोरे प्रल्हाद पाटील कराड यांच्या अध्यक्ष ते खाली शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे एक कलमी कार्यक्रमासाठी रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलन महाराष्ट्रात झाले होते त्या आंदोलनात दोन शेतकरी हुतात्मे झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु शेतकऱ्याला मात्र स्वातंत्र्य मिळाले नाही शेतकरी हा आजपर्यंत पारतंत्र्यातच राहिला शेतीमालाला रास्त आपल्याला भाव मिळाला नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला हे कर्ज अनैतिक स्वरूपाचे असून हे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे पाप आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आज 881 दिवस पूर्ण झाले ! हर घर काला झंडा हर खेत काला झेंडा हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर शांतिपूर्ण आहे असे बोराडे यांनी सांगितले.
10 नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधून सरकारचा निषेध म्हणून हर घर काला झेंडा हर खेत काला झेंड हे अभियान जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत काला झेंडा अभियान सुरूच राहणार असे बोराडे यांनी सांगितले हर घर काला झेंडा बालवीर काला झेंडा अभियानात सर्वस्वी समिती अध्यक्ष भगवान बोराडे भारत स्वाभिमान पक्षाचे प्रांत अध्यक्ष मोती नाना पाटील 938 आदिवासी विकास संस्था समिती अध्यक्ष कैलास बोरसे समन्वय समिती सदस्य दिलीप पाटील मुरलीधर दळवी भाऊराव भोये अशोक पाटील नामदेव बहिरम गिरीधर पवार कांतीलाल भोये संदीप पवार जयराम बहिरम विलास कुवर नंदाबाई पवार व इतर महिला या अभियानात उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असे बोराडे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV