
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। मनपा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा नागरी संवाद मेळावा संपन्न झाला प्रभाग क्रमांक 15 मातोश्री नगरात नागरीकांना सर्वतोपरी मदतीची आश्वासने देण्यात आली आहेत परभणी महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत मातोश्री नगरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या नागरी संवाद मेळाव्यात नेतेमंडळींसह नागरीकांनी नागरी समस्यांबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हितगूज केले.
भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश वरपूडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रशांत सांगळे, मोकिंद खिल्लारे, रितेश जैन, सौ. मंगल मुदगलकर, ठाकूर बुवा महाराज, दिलीप गिराम, अंकुशराव आवरगंड, अभिषेक वाकोडकर, अद्वैत पार्डीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी या प्रभागात विकास कामे सुरु आहेत, अशी माहिती नेतेमंडळींनी दिली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करत प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजनांचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले. प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis