परभणीत निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्ताने परभणी जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड
परभणीत निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्ताने परभणी जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीकरीता जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणूका केल्या आहेत.

गंगाखेड नगरपालिकेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे व मुख्याधिकारी जयंत सोनवने यांची नियुक्ती केली आहे. जिंतूरात उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार राजेश सरवदे व मुख्याधिकारी उमेश ढाकरे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सेलूत उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर तहसीलदार डॉ. शिवाजी मगर व मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. मानवत पालिकेत तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर नायब तहसीलदार संजय खिल्लारे व मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पाथरीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अरुणा गणेश संगेवार यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर नायब तहसीलदार कृष्णा देशमुख व मुख्याधिकारी युवराज पौळ यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सानपेठ पालिकेत तहसीलदार सुनील कावरखे यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर नायब तहसीलदार देवेंद्रसिंह ठाकूर व मुख्याधिकारी गणेश गाजरे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पूर्णेत तहसीलदार माधवराव बोथीकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी व नायब तहसीलदार प्रशांत धारकर व मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande