परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणूका भाजपा स्वबळावर लढविणार - जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणूका भाजप स्वबळावर लढविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे यांनी दिली आहे. 1 हजार 53 उमेदवारीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील जिंत
सर्व नगरपालिकांच्या निवडणूका भाजप स्वबळावर लढविणार


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणूका भाजप स्वबळावर लढविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे यांनी दिली आहे. 1 हजार 53 उमेदवारीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड व पालम या नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. जवळपास 1 हजार 53 अर्ज प्राप्त झाले आहेत. मुलाखतीच्याही कार्यक्रमास इच्छुकांद्वारे मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावरच काबीज करण्याचा संकल्प जिल्ह्यातील नेतेमंडळींनी सोडला असून त्या दृष्टीने नेतेमंडळींनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे, असे भूमरे यांनी म्हटले. जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूकीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने काम करतील व अधिकाधिक जागा निवडून आणतील, असा विश्‍वास भुमरे यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande