परभणी लिनेस क्लबच्या कामाचे झाले कौतूक
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑल इंडिया लिनेस क्लब एम, एच, फाईव्ह, हिरकणी प्रांत अध्यक्षा साधना पळसकर यांनी आपल्या परभणी दौर्‍या दरम्यान परभणी लिनेस क्लबच्या कामाचे कौतूक केले. येथील वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील श्र
परभणी क्लबच्या कामाचे केले कौतूक


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

ऑल इंडिया लिनेस क्लब एम, एच, फाईव्ह, हिरकणी प्रांत अध्यक्षा साधना पळसकर यांनी आपल्या परभणी दौर्‍या दरम्यान परभणी लिनेस क्लबच्या कामाचे कौतूक केले.

येथील वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रांताध्यक्षा पळसकर व सचिव सुवर्णा महाजन यांचे स्थानिक शाखेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सायेशा जाधव हीने स्वागतपर नृत्य सादर केले. या कार्यक्रमात विविध कला सादर करण्यात आल्या. यावेळी प्रांत अध्यक्ष पळसकर यांची धान्य तुला करण्यात आली व ते धान्य गरजूंना वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच वर्षभर घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांतर्गत विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली.

परभणी क्लब अध्यक्षा लि. रेखा सावते, सचिव सुरेखा पावडे, कोषाध्यक्ष जयश्री चरकपल्ली यांनी प्रांत अध्यक्षा व प्रांत सचिव यांच्यासह जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पूनम मारवाह, पूर्व क्लब अध्यक्षा हेमलता शहा आदींचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande