विद्यार्थांनी जिद्दीने अभ्यास करून यशोशिखर गाठावे : परभणी एसपी परदेशी
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी लढा देत जिद्दीने अभ्यास केला तर त्यांना आपले ध्येय असलेले यशोशीखर नक्कीच गाठता येईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले. व्हॉईस ऑफ
व्हाईस ऑफ मीडिया कडून शैक्षणिक किटचे वाटप


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी लढा देत जिद्दीने अभ्यास केला तर त्यांना आपले ध्येय असलेले यशोशीखर नक्कीच गाठता येईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के हे उपस्थित होते. व्यासपीठावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मराठवाडा कार्यकारीणी उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, परभणी तालुकाध्यक्ष संतोष मगर, शहराध्यक्ष दिवाकर माने उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले, आरोग्य शिक्षण, गृहनिर्माण, व्यावसायिक दृष्टीकोन, नवतंत्रज्ञान या क्षेत्रात या संघटनेने भरीव काम सुरू केले आहे. विधायक कामामुळे ही संघटना आता नावारुपास आली असून व्हॉईस ऑफ मीडिया सारखी संघटना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्यास हे विद्यार्थी गगनभरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रा. सोनटक्के म्हणाले, सध्या सर्वत्र पालकांना विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनाची चिंता लागली आहे. मोबाईलचे व्यसन हे किती घातक आहे हे त्यांनी सांगत विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे, असे आवाहन केले. ग्रामीण भागात राहूनही चांगले शिक्षण घेता येते, ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील कोणत्या क्षेत्रात मागे राहीले नाहीत, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास करावा आणि आपले ध्येय निश्‍चित करावे, असे आवाहन प्रा. सोनटक्के यांनी केले.

यावेळी विजय चोरडिया यांनी व्हाईस ऑफ मिडीयाने अल्पावधीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांनी पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानत संघटनेची ध्येय धोरणे सांगुन आता पर्यंत केलेल्या कामाची माहीती दिली. सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीया जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी बाळासाहेब काळे, सुधीर बोर्डे, मारोती जुंबडे, राजन मंगरुळकर, सय्यद युसुफ, विष्णु सायगुंडे, शेख मुबारक, गजानन साबळे, रियाज कुरेशी, ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या फार्मसी विभाग प्रमुख सौ. अनिता अर्जुन नजन, ऑनलाईन विभाग प्रमुख प्रा. गिरीश गच्चे यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande