
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)महाकाली चौकातील मंदिराचे नुकसान झाल्यानंतर परिसरात अनेकांच्या भावना दुखावल्याने नागरीक संतप्त झाले होते. यावेळी अनेक तर्कवितर्क लावून सोशल मिडियावर विविध चर्चांना उधाण येत होते. मात्र हा प्रकार जाणीवपूर्वक झाला नसल्याचे हा पोलिसांनी सांगितले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाकाली चौकात डी बी पथकाचे अंमलदार टवाळखोरांवर कारवाई करत होते. त्यावेळी त्यांना दोन इसम संशयास्पद आढळून आले. त्यांना पकडण्यासाठी अंमलदार जात असताना ते दोघे पळून जात होते. त्यावेळी दोघांचा तेथील दत्तमंदिराला धक्का लागून मंदिराच्या बाहेरील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दोघाही संशयित स्वप्निल प्रवीण जाधव व सोहेल फारुक पठाण यांना ताब्यात घेतले आहे. परिसरात शांतता असून, याप्रकरणी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV