सोलापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३३ जण ताब्यात
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. सुमारे पाच लाखांवर रोकड व २५ वाहने जप्त केली
सोलापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३३ जण ताब्यात


सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. सुमारे पाच लाखांवर रोकड व २५ वाहने जप्त केली आहेत. पोलिसांना पाहताच तिघेजण पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

ग्रामीण पोलिस दलातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून कोळा गावातील महावितरणच्या कार्यालयामागील एका शेतातील घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या नेतृत्वातील पथक तेथे पोचले. पाच अधिकारी व २५ अंमलदारांच्या पथकाने तेथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी ११ चारचाकी वाहने, १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.पळून गेलेल्या तिघांच्या वाहनांवरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.

कारवाईच्या ठिकाणावरून अंदाजे पाच लाखांवर रोकड जप्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांमार्फत सुरू होते. जुगार खेळणाऱ्या ३६ जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लागू शकते. दरम्यान, कोळा येथील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande