तीनपैक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध
- शासकीय वाहनाच्या गैरवापरास प्रतिबंध नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
Q


- शासकीय वाहनाच्या गैरवापरास प्रतिबंध

नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत तीनपैक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande