पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पुणे ते बेंगलोर हा
पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव


पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पुणे ते बेंगलोर हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसीत करण्याचं एनएचएआयने ठरवलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. ६९९ किमीचा हा मार्ग असून महाराष्ट्रात त्याची लांबी २०६ किमी इतकी असणार आहे.केंद्र सरकारने पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्गाला मान्यता दिल्यानंतर हा सहापदरी मार्ग होऊ शकेल. मान्यता मिळाल्यानंतर हा पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गाच्या प्रकल्पाचा विचार सुरू आहे. यासाठी ४२ हजार कोटींचा अंदाजे खर्च अपेक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande