
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मुग, उडीद व सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरु केली असून, प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी नोंदणी पॉस मशिनद्वारे ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे विक्रीसाठी सूचना देण्यात येतील. त्यानंतर शेतमाल प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर आणून विक्री करता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु