पुणे विद्यापीठातील चार अधिष्ठाता पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चार प्रमुख विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ही महत्त्वपूर्ण पदे रिक्त होती. विद्यापीठ प्रशासनाने आता या चारही पदांसा
University Pune SPUU


पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चार प्रमुख विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ही महत्त्वपूर्ण पदे रिक्त होती. विद्यापीठ प्रशासनाने आता या चारही पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली असून, येत्या गुरुवारपासूनअर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.अनेक वर्षांपासून ही चारही पदे रिक्त असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजाला एक प्रकारे खीळ बसली होती.आता नियुक्ती प्रक्रिया सुरू झाल्याने शैक्षणिक वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी १० जुलै २०२३ रोजीही अधिष्ठाता पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने अधिष्ठाता पदांसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया नव्याने केली जाणार असल्याचे स्पष्ट करत, ती भरती प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाला ती प्रक्रिया थांबवावी लागली. आता राज्य सरकारकडून आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande