पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३०० एकरहून अधिक जागेची आवश्यकता
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३०० एकरहून अधिक जागेची आवश्यकता आहे. यासाठी नुकतेच राज्य सरकारने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. या जागेत धावपट्टीचे विस्तारीकरण, खासगी हेलिकॉप्टर आणि विमानांसाठी
पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३०० एकरहून अधिक जागेची आवश्यकता


पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३०० एकरहून अधिक जागेची आवश्यकता आहे. यासाठी नुकतेच राज्य सरकारने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. या जागेत धावपट्टीचे विस्तारीकरण, खासगी हेलिकॉप्टर आणि विमानांसाठी स्वतंत्र टर्मिनल, विमानांची देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र ‘मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल’देखील (एमआरओ), पार्किंग-बे वाढविणे आदी कामे केली जाणार असून, हा पुणे विमानतळाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.पुणे विमानतळाच्या विकासासाठी आणि विस्तारीकरणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासाठी सुमारे ३०० एकराहून अधिक जागेची आवश्यकता आहे. यात काही जागा खासगी व्यक्तीची आहे, तर काही प्रमाणात जागा ही सरकारी मालकीची आहे. त्या जागेसाठी विमानतळ प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडेदेखील पाठविला जाणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच भूसंपादनाच्या हालचालींना वेग येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande