घरकूल लाभार्थ्यांना दिलासा; अनुदान होणार दुप्पट
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून घरकूल लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत होती. त्यामध्ये आता वाढ करण्या
घरकूल लाभार्थ्यांना दिलासा; अनुदान होणार दुप्पट


सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून घरकूल लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, त्या लाभार्थ्यांना एक लाख रुपये मिळणार आहे. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

या योजने अंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना पूर्वी 50 हजारापर्यंत लाभ देण्यात येत होता. शासनाने ही मर्यादा आता एक लाखापर्यंत वाढवली आहे. काही ठिकाणी रेडी रेकनर दर जास्त असल्याने 50 हजारात जागा घेणे लाभार्थ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्याची रक्कम दुप्पट केली आहे.दरम्यान, जिल्ह्यात मागील काही वर्षांत या योजनेतून हजारो घरकूल लाभार्थ्यांनी जागा घेऊन घरकुलांचे बांधकाम केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षात जागेचे दर वाढल्याने 50 हजार रुपयात जागा खरेदी होत नसल्याने त्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून सातत्याने होत होती. त्या मागणीचा विचार करुन शासनाने निधीत 50 हजारांनी वाढ केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता जागा घेण्यासाठी एक लाख रुपये मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande