महिला आघाडी संपर्क कार्यालय चळवळीचे केंद्र बनेल - ज्योती ठाकरे
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना महिला आघाडी सातत्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आली आहे. केवळ प्रश्नच नाही तर महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आहे. आता परभणीत महिलांसाठी सुरू केलेले हे महिला जिल्हा संपर्क कार्
महिला आघाडी संपर्क कार्यालय चळवळीचे केंद्र बनेल


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

शिवसेना महिला आघाडी सातत्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आली आहे. केवळ प्रश्नच नाही तर महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आहे. आता परभणीत महिलांसाठी सुरू केलेले हे महिला जिल्हा संपर्क कार्यालय निश्चितच महिलांच्या हक्काचे, चळवळीचे केंद्र बनेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा शिवसेना महिला आघाडी मराठवाडा समन्वयक ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख अंबिका डहाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष तथा शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. संप्रीया पाटील, मुंब्रा महिला आघाडी शहर प्रमुख डॉ.शाहीन,डॉ.विवेक नावंदर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ज्योती ठाकरे म्हणाल्या, शिवसेना महिला आघाडीसह आ. डॉ.पाटील यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी मोठे कार्य सुरू आहे. त्यांनी महिलांना थेट रोजगार, प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या उपक्रमाचे शासन देखील काही प्रमाणात अनुकरण करत आहे असे सांगितले.

यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले,आम्ही सातत्याने महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महिलांची स्वत:ची बँक असावी म्हणून आम्ही पतसंस्था देखील उभारली आहे. त्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जात आहे. त्यांना रोजगारासाठी आर्थिक मदत केली जात आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.महिलांच्या प्रत्येक अडचणींच्या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी मदतीसाठी धावून जाते. शिवसेना महिला आघाडीच्या पाठींब्यामुळे महिलांना भक्कम आधार मिळाला असल्याचे आ.डॉ.पाटील म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande