वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ओंकार ग्रुपच्या युनिट क्रं. 08 चा वैद्यनाथ साखर कारखान्याचा परिसरात बॉयलर अग्निप्रदिपण आणि गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ झाला.
वैद्यनाथ साखर कारखान्याचा परिसरात बॉयलर अग्निप्रदिपण आणि गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ

बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ओंकार ग्रुपच्या युनिट क्रं. 08 चा वैद्यनाथ साखर कारखान्याचा परिसरात बॉयलर अग्निप्रदिपण आणि गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ झाला.

याप्रसंगी बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की

कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करताना मनस्वी आनंद होतो आहे. ओंकार ग्रुपच्या माध्यमातून वैद्यनाथ साखर कारखान्याचा पुनर्जन्म झाला आहे. हा कारखाना पुन्हा एकदा उभा राहिल्याने परळी तालुक्यातील आणि परिसरातील अर्थव्यवस्था उभी राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आह.

यानिमित्ताने ऊस उत्पादक शेतकरी बांधवाना विश्वास देते, आपला कारखाना सर्वांच्या उसाचे गाळप करणार आहे. दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याचे आहे. निश्चित या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्वांचे कल्याण होईल. असेही त्यांनी सांगितले

याप्रसंगी मंचावर ओंकार ग्रुपचे बाबुराव बोत्रे पाटील, मा. आ. केशवराव आंधळे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत कराड,अजय मुंडे,विनोद सामत, रमेश कराड,सतीश मुंडे, शिवाजीराव मुंडे,राजेश गित्ते,सुरेश माने,वसंत राठोड,रोहित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande