भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचा वैजापूर बैठकीत निर्धार
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)एकजुटीने, समन्वयाने आणि सकारात्मक कार्यपद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्यासमोर व्यक्त केला.मंत्री अतुल सावे यांच्या उपस
एकजुटीने, समन्वयाने आणि सकारात्मक कार्यपद्धतीने विजयी होण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)एकजुटीने, समन्वयाने आणि सकारात्मक कार्यपद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्यासमोर व्यक्त केला.मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत वैजापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैजापूर येथे भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या बैठकीत निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेऊन पुढील विजयाची रणनीती निश्चित करण्यात आली. महायुती सरकारकडून शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या प्रसंगी मंत्री अतुल सावे, पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. संजय खंबायते तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande