
मनमाड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। आपली प्राथमिकता महायुतीला आहे आपण आपल्या मित्र पक्षासोबत चर्चा करून युती बाबत निर्णय घेऊ मात्र युती होऊ अथवा ना होऊ भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक कामाला लागावे असे स्पष्ट मत नगरपरिषद निवडणूकचे भाजपा नाशिक उत्तर जिल्हा प्रभारी डॉ. राहूल आहेर, यांनी व्यक्त केले मनमाड येथील बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या.
येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या मनमाड आणि नांदगाव नगरपरिषदच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मनमाड शहर व नांदगाव शहर भाजपा मंडलाच्या प्रमुख पदाधिकारीची संघटनात्मक बैठक संपन्न झाली चांदवड देवळा विधानसभा मतदार संघांचे आमदार तथा नगरपरिषद निवडणूकचे भाजपा नाशिक उत्तर जिल्हा प्रभारी डॉ. राहूल आहेर, उत्तर जिल्हा अध्यक्ष यतीन कदम, नंदकुमार खैरनार नितीन पांडे , जयकुमार फुलवाणी, गणेश धात्रक संदीप नरवडे , संजय सानप , दत्तराज छाजेड, सचिन दराडे, पंकज खताळ, नारायण पवार , ऍड जयश्री दौंड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या महत्वपूर्ण बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीत महायुती संदर्भात पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते चे मते जाणून घेण्यात आली, निवडणूक इच्छुक उमेदवार,आगामी निवडणुकीसाठीची दिशा, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क मोहीम, कार्यकर्त्यांची जबाबदारी, प्रचार नियोजन तसेच विकास आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला भाजपाचे माजी नगराध्यक्ष नारायण फुलवाणी, जेष्ठ नेते उमाकांत राय,जलील अन्सारी, भाजपा मनमाड शहर सरचिटणीस ऍड सुधाकर मोरे, आनंद काकडे, एकनाथ बोडखे,आनंद बोथरा, माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, लियाकत शेख, विजय मिश्रा भाजपा मनमाड शहर उपाध्यक्ष कैलास देवरे, मुर्तूझा रस्सीवाला, भाजपा वकील आघाडी मनमाड शहर अध्यक्ष ऍड राजेंद्र पांडे,संतोष जगताप,दिपक पगारे, सुमेर मिसर, बुऱ्हान शेख,डॉ सागर कोल्हे, दिपक दरगुडे,सचिन कांबळे, भरत काकड, प्रमोद जाधव,आशिष चावरिया, मुकेश पाटील, सप्टेंश चौधरी बुधन बाबा शेख, चंद्रकांत परब, ऍड शशिकांत व्यवहारे आदी मान्यवर सह मनमाड व नांदगाव शहरातील प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते बैठकी चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा नांदगाव मंडल अध्यक्ष संजय सानप, आनंद बोथरा यांनी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV