शेतीसाठी तारेची जाळी योजना..गडचिरोली जिप कृषी विभागाकडून ८५ टक्के पर्यंत अनुदानाची संधी
गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी तारेची जाळी (कुंपण) अनुदान योजना” सुरू केली
शेतीसाठी तारेची जाळी योजना..गडचिरोली जिप कृषी विभागाकडून ८५ टक्के पर्यंत अनुदानाची संधी


गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)

शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी तारेची जाळी (कुंपण) अनुदान योजना” सुरू केली आहे. ही योजना १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना तारेच्या जाळीच्या खर्चावर तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत भरघोस अनुदान मिळणार आहे.

योजनेचे मुख्य तपशील

योजनेचे नाव: शेतीसाठी तारेची जाळी योजना

अनुदान दर: ८५ टक्के किंवा ₹७,२३५ प्रति क्विंटल, महत्तम ₹२१,६७५/- (३ क्विंटल मर्यादेत) यापैकी जे कमी असेल ते.

उद्देश: शेतमालाचे वन्य प्राणी, डुक्कर, गाई, म्हशी यांसारख्या जनावरांपासून संरक्षण; तसेच रब्बी हंगामातील पिकाखालील क्षेत्रात वाढ घडविणे.

लाभार्थी: जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी (अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य).

अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे त्वरित अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अनुदानाची अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि सविस्तर माहिती संबंधित पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद कृषी विभाग कार्यालयात उपलब्ध आहे.

“शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेताचे आणि पिकांचे प्रभावी संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande