रत्नागिरी : साखरपा आरोग्य केंद्रात बुधवारी एक्सरे कॅम्प
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांच्या एक्सरेचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. शिबिरात ६० वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष तसेच त्यापेक्षा कमी वय असलेले पण मधुमेह आणि रक्तदाब विकार असलेले तसेच आ
रत्नागिरी : साखरपा आरोग्य केंद्रात बुधवारी एक्सरे कॅम्प


रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांच्या एक्सरेचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

शिबिरात ६० वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष तसेच त्यापेक्षा कमी वय असलेले पण मधुमेह आणि रक्तदाब विकार असलेले तसेच आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप आणि खोकला असलेल्या सर्व नागरिकांच्या छातीचे एक्स-रे मोफत काढण्यात येतील.

हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ नोव्हेंबरला दुपारी एक ते पाच या वेळेत होणार आहे. ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande