महायुतीने आगामी निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात आमचा सन्मान करावा - लतीफ तांबोळी
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही राज्यभरात कामा सोबत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मंगळवेढा तालुक्यात आमचा महायुतीने सन्मान केला तर ठीक नसेल तर आम्ही दामाजी नगर जिल्हा परिषद ग
महायुतीने आगामी निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात आमचा सन्मान करावा - लतीफ तांबोळी


सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही राज्यभरात कामा सोबत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मंगळवेढा तालुक्यात आमचा महायुतीने सन्मान केला तर ठीक नसेल तर आम्ही दामाजी नगर जिल्हा परिषद गट अन्य घटक पक्षाला सोबत घेऊन स्वबळावर लढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी यांनी दिला.वर्षानंतर प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे सुद्धा निवडणुकीच्या हालचाली तीव्र गतिमान झाल्या. त्यामुळे या निवडणुका लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक झाले. सध्याच्या काळात निवडणुका खर्चिक झाल्या असताना देखील निवडणुकीत दावेदारीवर अनेक जण आपला हक्क सांगू लागले. सध्या दामाजी नगर जिल्हा परिषद गट हा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे या गटातून गटातून स्थानिकापेक्षा बाहेरचे अनेक जण आपला हक्क सांगत त्यामध्ये महायुतीचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपला हक्क सांगितला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande