पुणे महापालिकेच्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या वतीने पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यास
पुणे महापालिकेच्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त


पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या वतीने पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ,ब,क,ड,इ,फ,ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ,ब,क,ड,इ,फ,ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ६,११,७,८,९,१९,३ आणि १२ अशा एकूण ७५ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. यावेळी नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था,पाणीपुरवठा समस्या,घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी, ड्रेनेज आणि गटार तुंबणे,रस्ते प्रकाश व्यवस्था,आरोग्य विभागाच्या सेवा,बांधकाम परवानग्यांतील विलंब,मोकाट जनावरांचा त्रास,बागा व सार्वजनिक ठिकाणांची देखभाल आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. या उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार होईल,तसेच शहरातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेल,असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande