
जालना, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। शंकर कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग येथे भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
या केंद्रामुळे शेतकऱ्यांचा कापूस शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी होणार असून खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबणार आहे. हा उपक्रम शेतकरी बांधवांच्या हितासाठी ठरेल. असे आमदार दानवे यांनी सांगितले.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कौतिकराव पाटील जगताप, उपसभापती मधुकर मुगुटराव, शंकर कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंगचे संचालक माधुशेठ डोभाळ, भूषण शर्मा, देसले साहेब, गोकुळ शेठ, ऋषिकेश पगारे, कैलास शेठ यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis