रत्नागिरी : राजापूरात लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पहिला अर्ज दाखल
रत्नागिरी, 11 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा उमेदवारी अर्ज ज्योती सुनील खटावकर, अपक्ष (हिंदू महासभा) यांनी दाखल
रत्नागिरी : राजापूरात लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पहिला अर्ज दाखल


रत्नागिरी, 11 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा उमेदवारी अर्ज ज्योती सुनील खटावकर, अपक्ष (हिंदू महासभा) यांनी दाखल केला आहे.

राजापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी मात्र लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. त्याव्यतिरिक्त अन्य अर्ज दाखल झाले नाहीत. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेला एकमेव अर्ज हा अपक्ष उमेदवाराचा आहे. राजापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande