
जालना, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। लक्ष्मणसिंह वर्मा यांचा शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
जालना शहरातील लोधी मोहल्ला येथे आज शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित भव्य जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात लक्ष्मणसिंह वर्मा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा सोहळा अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. “सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा, संविधानिक हक्क आणि विकास कामांची पूर्तता हेच आपले ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
“गणपती विसर्जन, दुर्गामाता विसर्जन, छटपूजा, याकरिता निर्माण केलेला भव्यविसर्जन कुंड यामुळे अत्यंत आरामदायक व विधिवत विसर्जन होत आहे जालना शहराचा पाणीपुरवठा, रस्ते, नाली, लाईट आणि सार्वजनिक सुविधा या सर्व विषयांवर आपण तत्परतेने कार्य करत आहोत.”
या कार्यक्रमाला युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, महेश दुसाने, दिनेश भगत प्रतापसिंह वर्मा, शुभम टेकाळे, राजू सरोदे, अशपाक पठाण, मनोज धानोरे, आशिष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लक्ष्मणसिंह वर्मा यांच्यासह धर्मसिंह वर्मा, बल्लेसिंग राजपूत, बालाजी राजपूत, तुळजा राजपूत, रामानंद सूर्यवंशी, आदींनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
----------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis