लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल जगभरातून शोक व्यक्त
नवी दिल्ली , 11 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भयानक स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी अजूनही रुग्णालयात जीवासाठी झुंज देत आहेत. या दु:खद
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल जगभरातून शोक व्यक्त


नवी दिल्ली , 11 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भयानक स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी अजूनही रुग्णालयात जीवासाठी झुंज देत आहेत. या दु:खद घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे जगभरातून भारतासाठी संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. जपान, इराण, अर्जेंटिना आणि ब्रिटनच्या राजनयिकांनी भारतासोबत दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वना दिली असून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

दिल्लीतील या स्फोटाबाबत जपानचे राजदूत ओनो केइची यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “दिल्ली स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे मी अत्यंत दु:खी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या सर्व कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमींच्या लवकर प्रकृती सुधारासाठी मी प्रार्थना करतो.” या दु:खद घटनेवर भारतातील इराण दूतावासानेही शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले की, “दिल्लीतील कार स्फोटात भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अनेकांच्या जखमी होण्याची बातमी ऐकून आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. आम्ही भारत सरकार आणि भारतीय जनतेप्रती मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो.” इराणी दूतावासाने पुढे लिहिले की, “आम्ही पीडित कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि त्यांच्या धैर्यासाठी प्रार्थना करतो. तसेच जखमींच्या लवकर आरोग्यलाभासाठी शुभेच्छा देतो.”

या स्फोटावर ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे प्रभावित सर्व लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रवाशांसाठी अद्ययावत मार्गदर्शन जारी केले आहे.” दरम्यान, भारतातील अमेरिकन दूतावासाने भारतात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा इशारा जारी केला आहे. दूतावासाने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारत सरकारने अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे. दूतावासाने आपल्या नागरिकांना सल्ला दिला आहे की, लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरात जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी सावध राहावे, स्थानिक माध्यमांद्वारे अद्यतन घेत राहावे आणि पर्यटन स्थळांवर सतर्कता बाळगावी. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, “या घटनेमुळे प्रभावित सर्व लोकांप्रती आमच्या मनापासून संवेदना आहेत आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.”याशिवाय मोरोक्कोच्या दूतावासानेही शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती मन:पूर्वक संवेदना आणि जखमींसाठी आरोग्यलाभाच्या शुभेच्छा दिल्या.

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनीदेखील आपल्या संदेशात मृतांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर आरोग्यलाभासाठी प्रार्थना केली. त्यांनी म्हटले की, “श्रीलंका भारत आणि त्याच्या जनतेसोबत ठामपणे उभी आहे.” अर्जेंटिनाचे राजदूत मारियानो काउसिनो यांनीही या भीषण घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “अर्जेंटिनाच्या जनतेतर्फे आणि सरकारतर्फे आम्ही त्या सर्व कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. आमच्या प्रार्थना त्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.”

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटले की, “या घटनेत मृत झालेल्यांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर आरोग्यलाभाची कामना करतो. या कठीण काळात मालदीव भारत आणि त्याच्या जनतेसोबत उभा आहे.” तसेच बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्लाह यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “बांगलादेश या संकटाच्या क्षणी भारतासोबत आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर आरोग्यलाभासाठी प्रार्थना करतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande