कसबा-विश्रामबाग क्षेत्रात अस्वच्छतेवर महापालिकेची दंडात्मक कारवाई
पुणे, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत दंडात्मक कारवाई केली आहे. जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ हजार ७७८ जणांवर कारवाई करत तब्बल १० लाख ६
कसबा-विश्रामबाग क्षेत्रात अस्वच्छतेवर महापालिकेची दंडात्मक कारवाई


पुणे, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत दंडात्मक कारवाई केली आहे. जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ हजार ७७८ जणांवर कारवाई करत तब्बल १० लाख ६९ हजार ८६४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत मुख्यतः सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा टाकणे, थुंकणे, प्लास्टिक कारवाईसह रस्त्यावर कचरा जाळणे अशा प्रकारांवर कारवाई झाली आहे.स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियमित गस्त वाढवून ही कारवाई अधिक गतीने सुरू ठेवली आहे. या कालावधीत जानेवारी २०२५मध्ये सर्वाधिक ३४९ प्रकरणांवर कारवाई करून २ लाख ६ हजार ९५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर अस्वच्छता केल्याप्रकरणी १ हजार ६९९ नागरिकांवर दंड आकारून ८ लाख ३० हजार ४६४ रुपये वसूल करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande