नाशकात महाराष्ट्र राज्य शालेय खो-खो स्पर्धा संपन्न
नाशिक, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये १९ वर्षे मुले आणि मुली या वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य आंतर विभागीय खो- खो स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या
महाराष्ट्र राज्य शालेय खो-खो स्पर्धा. मुंबई, लातूर कोल्हापूर, नाशिक, पूणे विभागांचे संघ उपांत्य फेरीत दाखल.


महाराष्ट्र राज्य शालेय खो-खो स्पर्धा. मुंबई, लातूर कोल्हापूर, नाशिक, पूणे विभागांचे संघ उपांत्य फेरीत दाखल.


नाशिक, 16 नोव्हेंबर, (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये १९ वर्षे मुले आणि मुली या वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य आंतर विभागीय खो- खो स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर करण्यात आले आहे. दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुंबई, पुणे, लातूर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक या आठ विभागाच्या विजेत्या संघांच्या आठ मुले आणि आठ मुली या आठ विभागाच्या विजेत्या संघाचा समावेश आहे. या स्पर्धामध्ये सहभागी आठ संघामध्ये अ आणि ब असे दोन गट करण्यात आले असून या संघामध्ये प्रथम गटवार साखळी सामने खेळविले गेले. या गटवार साखळी सामन्यांच्या निकालानुसार मुलांच्या गटातून पुणे, लातूर, मुंबई आणि कोल्हापूर या चार संघांनी आपल्या गटामधून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे तर मुलींच्या गटामध्ये कोल्हापूर, मुंबई, लातूरसह यजमान नाशिकच्या संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मुलीच्या ब गटात नाशिक आणि कोल्हापूर यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या निर्णायक साखळी सामन्यात पहिल्या सत्रात दोन्हीही संघांची ५-५ अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात शेवटच्या दीड मिनिटात कोल्हापूर संघाने चांगला खेळ करत दोन गुण मिळवीत हा सामना जिंकून गटामध्ये पहिल्या क्रमांकाने उपांत्य फेरी गाठली आणि नाशिकला दुसरा क्रमांक मिळाला. आता उपांत्य फेरीमध्ये मुलांच्या गटामध्ये पुणे विरुद्ध कोल्हापूर आणि लातूर विरुद्ध मुंबई अश्या लढती रंगतील. तर मुलींमध्ये कोल्हापूर विरुद्ध लातूर आणि मुंबई विरुद्ध नाशिक असे चुरशीचे सामने बघायला मिळणार आहेत.

या स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंके, नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व क्रीडा अधिकारी आणि नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन आणि स्व. सुरेखाताई भोसले खो-खो प्रबोधिनीचे प्रमुख मंदार देशमुख, उमेश आटवणे आणि त्यांचे सर्व सहकारी, यांच्याबरोबर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पंच मंडळ कार्यरत आहे.

या स्पर्धेनंतर खेळाडूंच्या गुणवत्तेनुसार खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघासाठी निवड करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.

रविवारी झालेल्या स्पर्धांचे निकाल :

मुले :- १) पुणे विजयी विरुद्ध मुंबई - ( १ गुण आणि १.४० मिनिटे राखून)

२) नाशिक विजयी विरुद्ध नागपूर - १ डाव आणि ५ गुणांनी विजय.

३) लातूर विजयी विरुद्ध कोल्हापूर - ५ गुणांनी विजय.

४) कोल्हापूर विजयी विरुद्ध अमरावती - १ डाव आणि ८ गुणांनी विजय.

मुली :- १) मुंबई विजयी विरुद्ध लातूर - १ गुण आणि ३० सेकंड राखून विजय.

२) कोल्हापूर विजयी विरुद्ध नाशिक - २ गुणांनी विजयी.

३) पुणे विजयी विरुद्ध नागपूर - १ डाव आणि ६ गुणांनी विजयी.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande