
वेलिंग्टन, 16 नोव्हेंबर (हिं.स.)क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा ७ धावांनी पराभव केला. किवी संघाने ७ गडी बाद २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिज संघ ५० षटकांत ६ गडी बाद २६२ धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने ११८ चेंडूत ११९ धावांची शतकी खेळी केली, तर काइल जेमिसनने ३ विकेट्स घेतल्या.
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. संघाने २४ धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर डॅरिल मिशेलने शतक झळकावले आणि अनेक महत्त्वाच्या भागीदारी केल्या. मॅथ्यू फोर्डने ७ व्या षटकात रचिन रवींद्र (४) आणि विल यंग (०) यांना सलग चेंडूंवर बाद करून न्यूझीलंडला सुरुवातीचा धक्का दिला. २४ धावांत दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर संघ दबावाखाली होता.पण त्यानंतर त्यांचा डाव सावरला.
सलामीवीर ड्वॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ चेंडूत ६७ धावांची भागीदारी केली. तर कॉनवे ५८ चेंडूत ४९ धावा काढून बाद झाला.त्यानंतर मिशेलने टॉम लॅथमसोबत ५२ चेंडूत ३२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. लॅथमने ३० चेंडूत १८ धावा केल्या. डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी पाचव्या विकेटसाठी ८६ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ब्रेसवेलने ५२ चेंडूत ३५ धावा केल्या. मिशेलने जॅक फॉल्केससोबत सातव्या विकेटसाठी फक्त २४ चेंडूत ४३ धावा जोडल्या. फॉल्केस १६ चेंडूत २२ धावा काढून नाबाद राहिला. डॅरिल मिशेलने ११८ चेंडूंचा सामना केला आणि ११९ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्सने ३ विकेट्स, मॅथ्यू फोर्डने २ विकेट्स, जस्टिन ग्रीव्हज आणि रोस्टन चेसने प्रत्येकी १ विकेट घेतली.
२७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉन कॅम्पबेल फक्त १० धावा करून बाद झाला. त्याने ९ चेंडूत ४ धावा केल्या. त्यानंतर केसी कार्टीने ६७ चेंडूत ३२ धावांची संथ पण संयमी खेळी केली. कर्णधार शाई होपने ४५ चेंडूत ३७ धावा जोडल्या. दरम्यान, शेरफेन रदरफोर्डने संघासाठी सर्वात महत्त्वाची खेळी केली आणि ५५ धावा केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे