लाचखोर अधिक्षकाच्या अडचणींत वाढ, जामीन देण्यास पुण्याच्या सीबीआय विशेष न्यायालयाचा स्पष्ट नकार
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। सीजीएसटीच्या लाचखोर अधिक्षकाच्या अडचणींत वाढ झाली असून, या प्रकरणात पुणे येथील सीबीआय विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नाशिक येथील सीजीएसटी विभागाचा अधिक्षक हरीप्रकाश शर्मा याने कोणतीही बेकायदेशीर बा
लाचखोर अधिक्षकाच्या अडचणींत वाढ, जामीन देण्यास पुण्याच्या सीबीआय विशेष न्यायालयाचा स्पष्ट नकार


नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

सीजीएसटीच्या लाचखोर अधिक्षकाच्या अडचणींत वाढ झाली असून, या प्रकरणात पुणे येथील सीबीआय विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

नाशिक येथील सीजीएसटी विभागाचा अधिक्षक हरीप्रकाश शर्मा याने कोणतीही बेकायदेशीर बाब नसताना कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून ५० लाख रुपयांची मागणी केली. २२ लाख रुपयात तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने सीबीआयने कारवाई करत अटक केली आहे. आता पुणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हरीप्रकाश शर्मा, अर्पीत गौर, अखिलेश सिंग, अभिषेक चंदेल या चौकडीने सीजीएसटी विभाग नाशिक येथून आल्याचे सांगत उद्योजकाला धमकावत ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर उद्योजकास कार्यालयात बोलावून पुन्हा पैशाची मागणी केली. त्रस्त उद्योजक यांनी पुणे येथील सिबीआयच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सदर विभागाने तत्काळ याची दखल घेत १४ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या सीजीएसटी विभागाबाहेर सापळा लावला ५ लाखाची लाच स्वीकारताना शर्मा यास रंगेहाथ पकडले.

या दरम्यान शर्माने वेळोवेळी जामीनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. तक्रारदाराचे वकील पाठक व मनिष सचदेवा यांनी प्रभावीपणे वास्तविक स्थीती न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. मेंधे यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुन हरीप्रकाश शर्मा यास जामीन नाकारला. यामुळे शर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande