
कोलकाता, 16 नोव्हेंबर, (हिं.स.) - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ईडन गार्डन्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर टीका होत असताना बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीने क्युरेटर सुजन मुखर्जी यांचे समर्थन केले आहे. पहिल्या दिवसापासूनच खेळपट्टी गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरली होती. आणि त्यामुळे फलंदाजांना संघर्ष करावा लागला.
सौरव गांगुली यांच्या आधीच्या आश्वासनांविरुद्ध बॅट आणि बॉलमध्ये समान स्पर्धा नसल्याचा संकेत देणारा टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज होता. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनीही आपले मत व्यक्त करत खेळपट्टीला अत्यंत खराब म्हटले. गांगुलीने सांगितले की, खेळपट्टी भारताला हवी तशीच तयार करण्यात आली होती. त्यांनी पुढे असेही म्हटले की, जेव्हा एखाद्या खेळपट्टीला चार दिवस पाणी दिले जात नाही तेव्हा ती स्वाभाविकपणे तशीच वागते.
गांगुली यांनी सांगितले की , भारतीय संघाला हवी असलेली खेळपट्टीच असते. जेव्हा तुम्ही चार दिवस खेळपट्टीला पाणी देत नाही तेव्हा असेच घडते. क्युरेटर सुजन मुखर्जी यांना दोष देता येणार नाही. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात गोलंदाजांची ताकद दिसून आली आहे. पहिल्या दिवशी एकूण ११ फलंदाज बाद झाले होते. तर दुसऱ्या दिवशी विकेट्स गोलंदाजांनी घेतल्या होत्या. शनिवारी फिरकीपटूंना खेळपट्टीकडून चांगली साथ मिळालेली पहायला मिळाली.
दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी कबूल केले की, त्यांना खेळपट्टी इतक्या लवकर खराब होईल अशी अपेक्षा नव्हती. मोर्केल म्हणाले, हो, खरं सांगायचं तर, आम्हालाही खेळपट्टी इतक्या लवकर खराब होईल अशी अपेक्षा नव्हती. जेव्हा आम्ही सर्वांनी पहिले काही तास ते पाहिले तेव्हा आम्हाला वाटले की, ती एक चांगली खेळपट्टी आहे, म्हणून ती खूप लवकर खराब झाली, जी अनपेक्षित होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे