मुंबईमधील नौदल डॉकयार्ड उडवून देण्याची धमकी: दोघांना अटक
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।मुंबईमध्ये रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी नौदलाच्या डॉकयार्डला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. डॉकयार्डमधील दोन कर्मचार्‍यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी दिली होती. त्यानंतर तात्काळ कारवाई करत मुं
मुंबईमधील नौदल डॉकयार्ड उडवून देण्याची धमकी: दोघांना अटक


मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।मुंबईमध्ये रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी नौदलाच्या डॉकयार्डला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. डॉकयार्डमधील दोन कर्मचार्‍यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी दिली होती. त्यानंतर तात्काळ कारवाई करत मुंबई पोलिसांनी दोघांचा शोध लावून त्यांना अटक केली.

चौकशीत उघड झाले की धमकी देणारा व्यक्ती फोन करताना दारूच्या नशेत होता आणि तो डॉकयार्डचा कर्मचारीच आहे. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तोही त्याच डॉकयार्डचा कर्मचारी आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की दोघांनीही मद्यधुंद अवस्थेत खोटी धमकी दिली होती.

रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात जहाँगीर शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर स्वतः आंध्र प्रदेशमध्ये असल्याचे खोटे सांगितले होते आणि कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने त्याला हल्ल्याची माहिती दिल्याचा दावा केला होता.

धमकी मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आणि सुरक्षा प्रोटोकॉल तात्काळ लागू करण्यात आले. डॉकयार्ड परिसर आणि आसपास शोधमोहीम राबवली गेली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा हालचाल आढळली नाही.

यानंतर अधिकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा माग काढून त्याला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की खोटी धमकी देण्यामागे नेमका उद्देश काय होता आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग होता का.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande