

अकोला, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यभरात नगरपरिषद आणि पंचायत निवडणुकीचा धडाका सुरू झालाय… आणि नेहमीप्रमाणे प्रचारापेक्षा जास्त धामधूम घराघरातील उमेदवारांची.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पक्षांनी कितीही घोषणा केल्या तरी, “कुटुंब” नावाची गोष्ट राजकारणात अजूनही व्हीआयपी पास घेऊन येते हे पुन्हा सिद्ध झालंय.
बाळापुरमध्ये ‘खतीब कुटुंब’ पुन्हा एंट्री..बाळापुर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीने रजिया बेगम खतीब यांचं नाव जाहीर केलं आहे.आणि हो… या नावामागे एक महत्त्वाचा “कुटुंबीय ट्विस्ट” आहे..रजिया बेगम म्हणजे वंचितचे नेते नतिकोद्दीन खतीब यांच्या सौभाग्यवती.
नतिकोद्दीन खतीब हे काँग्रेसचे माजी आमदार… नंतर वंचितमध्ये प्रवेश… आणि आता पत्नीला दुसऱ्यांदा चीफ पोस्टवर पाठिंबा.रजिया बेगम आधीही नगराध्यक्ष राहिल्यात. आता पुन्हा एकदा त्या “किस्मत की चाबी” वळवण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
तर दुसरीकडे मुर्तीजापुरमध्ये ‘पिंपळे बंधूंचे ' राजकारण.
मुर्तीजापुरचे भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे भाऊ भूपेंद्र पिंपळेही मागे नाहीत.नगरसेवक पदाकरिता तेही रिंगणात उतरले असून - होय - हेही त्यांचं दुसरं इनिंग आहे.निवडणुकांची घोषणा झाली की पक्षकार्यकर्त्यापेक्षा जास्त धावपळ होते कुटुंबातील स्पर्धकांची,
राजकारणात घराणेशाही संपली म्हणतात… पण उमेदवारांच्या याद्या मात्र उलटच सांगताहेत,“राजकारण बदललंय, पण उमेदवार अजूनही घरातूनच येतो”अशी टीका सर्वसामान्यांकडून आता होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे