
बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)गेल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यात सर्वच भागात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे हवेतील गारठा यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे झाले आहे
मागील पाच ते सहा दिवसांपासून बीड जिल्ह्यात थंडीत मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी कडाक्याचे ऊन तसेच सायंकाळी कमालीची थंडी पडत असल्याने सायंकाळी रस्त्यांवर लवकरच - शुकशुकाट पाहायला मिळत आहे. किमान तापमानाचा पारा १२ तर कमाल २९ अंशांवर पोहचले होते. बीड जिल्ह्यातही राज्याच्या तुलनेत कमालीची थंडी पडत असल्याने कमालीचा गारवा निर्माण होत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला थंडी २४ अंशावर होती. पहिल्या आठवड्यातच एका अंशाने दिवसाला यामध्ये घट झाली. एकदम थंडीत वाढ झाली. त्यानंतर पुन्हा तापमानात घट होत १२ अंशावर पारा पोहचला होता. पुढील पाच दिवसांत यामध्ये चढउतार झाल्याचे पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
थंडी वाढल्यामुळे स्वेटर खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis