अमरावती : सफाई कंत्राटाचा निर्णय कोर्टाच्या अधीन , मनपाला नोटीस
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : प्रतीस्पर्धी कंपनीने न्यायालयात धाव घेतल्यामुळे अमरावती मनपातील सफाईचे कंत्राट न्यायालयीन निर्णयाच्या अधीन झाले आहे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा प्रक्रियेच्या पात्रतेची अटी पूर्ण न केल्याचा आरोप याचिकेमध
गोपीनाथ रेड्डी कंपनीची हायकोर्टात धाव  कोर्टाच्या अधीन सफाई कंत्राटाचा निर्णय  नागपूर न्यायालयालयाची मनपाला नोटीस


अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : प्रतीस्पर्धी कंपनीने न्यायालयात धाव घेतल्यामुळे अमरावती मनपातील सफाईचे कंत्राट न्यायालयीन निर्णयाच्या अधीन झाले आहे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा प्रक्रियेच्या पात्रतेची अटी पूर्ण न केल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आला आहे. नागपूर उच्च न्यायालयाने याप्रकरणी मनपाला नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सफाईचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत असलेल्या कर्नाटकच्या पी गोपीनाथ रेड्डीकंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठापुढे याचिका दाखल केली आहे. सफाईचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा दाखल केलेल्या कोणार्क इन्फ्रास्टक्चर आणि अर्बन इनवायरो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या दोन प्रमुख कंपन्यांनी निविदा प्रक्रियेची पात्रता पूर्ण न केल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आला आहे. निविदा प्रक्रि येला स्थगिती देण्याची विनंतीही याचिकेमधून करण्यात आली आहे. न्यायालयाने मनपाला दोन आठवड्यात बाजू बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती मनपातील सफाईचे कंत्राट घेण्यासाठी तिन कंपन्या मैदानात उतरल्या होत्या. त्यामध्ये कोणार्क इन्फ्रास्टक्कर, अर्बन एनवायरो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि पी गोपीनाथ रेड्डी यांचा समावेश होता. यापैकी सर्वाधिक कमी रक्कमेचीनिविदा असलेल्या कोणार्कलावर्क ऑर्डर जारीकरण्याची प्रक्रिया केली जाणार होती. त्याआधीचपीगोपीनाथ रेड्डी कंपनीने स्पर्धेतील अन्यदोन कंपन्यांच्याविरोधात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेची पात्रता पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे. या याचिकेवर न्यायालयाने मनपा प्रशासनाला नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande