
लातूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील नगराध्यक्षपदासाठी एकुण १०३ तर नगरसेवकपदासाठी १ हजार २५७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
उदगीर, अहमदपूर, औसा व निलंगा या चार नगरपरिषदांसह रेणापूर नगरपंचायतीची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरु आहे.
चार नगरपरिषदांच्या नगराध्यक्षासह नगरसेवकपदांसाठी दि. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन दाखल करण्यात आली. दि. १७ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उदगीरमध्ये नगराध्यक्षपदासाठी ७, नगरसेवकपदासाठी १७२ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. उदगीर नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकुण २० तर नगरसेवकपदासाठी ३५८ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी १० तर नगरसेवकपदासाठी १८० नामनिर्देशन पत्र दाखल झाले. अहमदपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी एकुण १४ तर नगरसेवक पदासाठी २४० नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
औसा नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी सोमवारी १५ तर नगरसेवकपदासाठी १४६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली. औसा नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे एकुण १६ तर नगरसेवकपदाचे २०४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. निलंगा नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी ११ तर नरगरसेवकपदासाठी ४४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. निलंगा नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी एकुण २९ तर नगरसेवकपदासाठी एकुण २३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.रेणापूर नगरपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी १७ तर नगरसेवकपदासाठी १५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. रेणापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी एकुण २४ तर नगरसेवकपदासाठी एकुण २२१ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. चार नगरपरिषदांत नगराध्यक्षपदासाठी एकुण १०३ तर नगरसेवकपदासाठी १ हजार २५७ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. निवडणुक कार्यक्रमानूसार आज दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी करुन वैध उमेवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उद्या दि. १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. दि. २६ नोव्हेंबर रोजी निवडणुक चिन्ह नेमून देण्याबरोबरच निवडणुक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis