नंदुरबार : परवानाधारक वाहनातून पाल्यांना शाळेत पाठवावे - उत्तम जाधव
नंदुरबार, 18 नोव्हेंबर (हिं.स.) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना परवानाधारक स्कुल बस/व्हॅन मधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी पत्रकान्वये
नंदुरबार : परवानाधारक वाहनातून पाल्यांना शाळेत पाठवावे - उत्तम जाधव


नंदुरबार, 18 नोव्हेंबर (हिं.स.) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना परवानाधारक स्कुल बस/व्हॅन मधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी पत्रकान्वये केले आहे.

अवैध रिक्षा किंवा इतर परवाना नसलेल्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केल्यास अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवितांना खबरदारी घ्यावी, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande