कोल्हापूर : कागल तालुक्यात रंगला संघर्ष आणि युतीचा खेळ
कोल्हापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। कागल तालुक्यातील दिग्गज राजकीय नेत्यांच्यात संघर्ष आणि युतीचा खेळ पुन्हा रंगात आला. अनेक वर्षा एकमेकांच्या विरोधात संघर्ष करणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे अचानक एकत्र आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी आज पत
मुश्रीफ, घाटगे, मंडलिक


कोल्हापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।

कागल तालुक्यातील दिग्गज राजकीय नेत्यांच्यात संघर्ष आणि युतीचा खेळ पुन्हा रंगात आला. अनेक वर्षा एकमेकांच्या विरोधात संघर्ष करणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे अचानक एकत्र आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कागलच्या विकासाठी एकत्र आल्याचे सांगितले. तसेच हो, एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय; असेही ते म्हणाले. तर या युतीवर मंडलिक गटाचे नेते असलेले शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी याबाबत संताप व्यक्त करताना जनता माझ्या बरोबर आहे. मला एकटे पाडणे अशक्य आहे. अशी प्रतिक्रिया दिली.

यापूर्वी समरजीत घाटगे प्रथम भाजप मध्ये होते. मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादीत होते. या दोघात टोकाचा संघर्ष होता. राष्ट्रवादीत फुट पडली. महायुतीच्या माध्यमातून मंडलिक-मुश्रीफ एकत्र आले. घाटगेनी भाजप सोडली. राष्ट्रवादी शरद पवार गटातून विधानसभा मुश्रीफांच्या विरोधात लढवली.

यामुळे मुश्रीफ-घाटगे गटात संघर्ष वाढत गेला. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अचानक दोघे एकत्र आले. तेही संजय मंडलिकांना एकटे सोडून आणि आप आपल्या कार्यकर्त्यांना कसलीही कल्पना न देता. यामुळे कागल तालुक्यातील राजकारण धक्क्याने ढवळून निघाले. मुश्रीफ-घाटगे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.पत्रकार परिषदेत बोलताना समरजीत सिंह घाटगे यांनी अदृश्य शक्तीचा हात असाच राहिला तर ही युती बराच काळ टीकेल, असेही स्पष्ट केले आहे. २०११ ते २०१६ आमची आणि मुश्रीफ यांची युती होती, त्यावेळी आम्ही जो कारभार केला तो लोकांसमोर आहे. त्यामुळे या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलो पाहिजे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आमच्या दोघांमध्ये समन्वय चांगला आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले ते आम्ही सोडवू. आमची युत्ती सत्तेसाठी नाही, कागलच्या विकासासाठी आहे, असंही समरजित घाटगे म्हणाले.

वरिष्ठ पातळीवर संघर्ष मिटवण्याचे ठरले. यामध्ये मी आणि हसन मुश्रीफ यांनी सकरात्मक भुमिका घेतली. आमची बैठक चांगली झाली, बैठकीवेळी कोणासोबत बोलायला वेळ मिळाला नाही. विकासाचे मॉडेल घेऊन गेलो. आता अदृश्य शक्तीचा हात असेल तर ही युती बराच काळ टीकेल अशी अपेक्षा व्यक्त करु, असंही घाटगे म्हणाले. यावेळी हसन मुश्रीफ यांनीही युतीवर प्रतिक्रिया दिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ही कोणत्या परिस्थितीत युती झाली हे समजून घ्यावे. आम्ही काल प्रसार माध्यमांमध्ये भूमिका मांडली होती. अचानक झालेल्या युतीमुळे कोणत्या कार्यकर्त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून दिलगिरी व्यक्त केली होती. मी काल संजय घाटगे यांच्याबाबत भूमिका व्यक्त केली होती. कागलच्या विकासासाठी संघर्ष सोडून एकत्र येऊन काम करायचे असे ठरवले आहे.

मुश्रीफ-घाटगे युती बाबत शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांचेवर निशाणा साधला. ते म्हणाले. कागलची जनता कायम आमच्या मागे आहे. कागल मुरगुड मध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढत आहोत. यामध्ये आम्हाला यश मिळेल. मुश्रीफ यांना तहहयात आमदार मंत्री रहायचे आहे म्हणून ते कोणाशीही कशीही युती करतात पण ज्यानी त्याना मोठे केले त्यांना ते विसरतात. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची नीती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande