
लातूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूर आणि अलिफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पहिला आणि सर्वात मोठा ‘स्टडी अॅब्रॉड फेअर’ दि. १९ नोव्हेंबर रोजी व्ही. डी. एफ. कॅम्पस (नवीन एमआयडीसी, एअरपोर्ट रोड, लातूर) येथे आयोजित करण्यात येत आहे. लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
या ‘स्टडी अॅब्रॉड फेअर’ फेअरमध्ये अमेरिका, इंग्लंड, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूर, दुबई, नेदरलँड, मलेशिया अशा अनेक देशांमधील १५ हून अधिक नामांकित विद्यापीठे सहभागी होणार आहेत. लातूरमध्ये बसून जगभरातील विद्यापीठांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
मेळाव्यात सहभागी होणारी प्रमुख विद्यापीठे:यू.एम.ए.एस.एस. बोस्टन (अमेरिका), यू.सी.ए.एम. (स्पेन), एशिया स्पेसिफिक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन-ए.पी.यु. (मलेशिया), डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी (इंग्लंड), टी.आय.ओ. बिझनेस स्कूल (नेदरलँड), एच.टी.एम.आय. (स्वित्झर्लंड), जर्मन इंटरनॅशनल कॉलेज (जर्मनी), युनिव्हर्सिटी ऑफ कॅटरबरी (न्यूझीलंड) एम.डी.एक्स. दुबई (दुबई).
या मेळाव्यात संबंधित विद्यापीठांच्या तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरणारे सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. अभ्यासक्रम आणि संधी विविध देशांतील विद्यापीठांतर्गत चालणारे अभ्यासक्रम, त्यांचे महत्त्व, पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरीच्या संधी याबद्दल माहिती मिळेल. शिष्यवृत्ती योजना: किमान खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण कसे घ्यावे, देशनिहाय विविध शिष्यवृत्ती आणि असिस्टंटशिप्स याची सविस्तर माहिती दिली जाईल. मार्गदर्शन: परीक्षा कशी द्यावी, किती गुण लागतात आणि कोणत्या कोर्स, देशासाठी कोणती परीक्षा आवश्यक आहे,
यासाठी खास मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. व्यवहारिक माहिती: निवास, भोजन, हॉस्टेल, पार्ट-टाइम जॉब्स आणि स्थानिक सुविधा (राहण्याचा खर्च, सुरक्षितता) याबद्दल पारदर्शक आणि अचूक माहिती दिली जाणार आहे.
हा फेअर म्हणजे संपूर्ण जग एका छताखाली आणणारा सुवर्णमेळावा आहे. तेव्हा लातूर जिल्ह्यातील १२ वी, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये शिक्षण घेत असलेल्या अंतिम वर्षातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ‘स्टडी अॅब्रॉड फेअ TVर’फेअरला १९ नोव्हेंबर रोजी भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सचे प्राचार्य डॉ. बालाजी वाकुरे, प्रा. राजकुमार साखरे आणि प्रा. महेश शिंदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis