लातूर तालुक्यातील रामेगाव येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन
लातूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी लातूर तालुक्यातील रामेगाव येथील महाविहार, धम्म केंद्र सातकर्णीनगर येथे आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली
लातूर तालुक्यातील रामेगाव येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन


लातूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।

बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी लातूर तालुक्यातील रामेगाव येथील महाविहार, धम्म केंद्र सातकर्णीनगर येथे आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. धम्म परिषदेत संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी दिली.

बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय भिक्खू शाखा महाराष्ट्र (मुळावा)चे अध्यक्ष भिक्खू धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार असल्याचे नमुद करुन भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले, सकाळच्या पहिल्या सत्रात सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पंचरंगी धम्मध्वजारोहण, त्यानंतर धम्म मिरवणुकीस प्रारंभ होईल. या मिरवणुकीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर होणार आहे. तेथे सकाळी १० वाजता पाथरीचे भिक्खू शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते मुख्य धम्मध्वजारोहण होणार आहे.

दुस-या सत्रात महाविहार, धम्म केंद्र सातकर्णीनगर येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानंतर सातकर्णी स्मरणिका प्रकाशन, प्रमुख धम्मदेसना, पाच विषयांवर पाच परिसंवादही होणार आहेत. धम्म परिषदेस संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकातील भिक्खू उपस्थित राहणार आहेत. धम्म परिषदेनंतर रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध गायक विकास राजा यांचा बुद्ध, भीम गितांचा कार्यक्रम होणार आहे. या पत्रकार परिषदेस भंते बोधीराज, केशव कांबळे, प्रा. डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. सुधाकर गुळवे, प्रा. देवदत्त सावंत, एम. एन. गायकवाड, डी. एस. नरसिंगे, प्रा. डॉ. संजय गवई, प्रा. कल्याण कांबळे, बसवंतअप्पा उबाळे, मिलिंद धावारे यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande