
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून तपोवनातील साधुग्राममध्ये कामाला सुरवात होणार आहे. तपोवनातील 54 एकरच्या क्षेत्रात अठराशेहून अधिक झाडे आहेत. मात्र यातील केवळ् काटेरी झाडे-झुडपे तोडली जाणार आहेत. तर आवश्यक्तेनुसार काही झाडांच्या फांद्या छाटल्या जाणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या उद्यान विभागाने दिले आहे. गतवेळेस साधुग्राममध्ये साधू-महंताचे आखाडे होते, त्यापरिसरात चारशेहून अधिक काटेरी बाभळीचे झाडे उगवली असल्याने ती तोडावीच लागणार आहे. त्याशिवाय साधुग्राममध्ये कोणतेही काम करणे अशक्य आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात रस्ते, पूल, स्वच्छता, वाहतूक, पाणी पुरवठा आदीसह विविध कामे पालिका प्रशासनाकडून कामे केली जाणार आहेत. सिंहस्थाचे केंद्रस्थान असलेल्या साधुग्राममध्ये अद्याप कुठलेही कामे सुरु झाले नसल्याचे चित्र आहे. परिणामी यावरुन साधू-महंताकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान 2015 साली झालेल्या सिंहस्थकुंभमेळ्यात साधुग्रामध्ये साधू-महंतांना टेंट उभारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याकरिता रस्ते तयार करण्याबरोबरच पथदीप, पाणी पुरवठा, स्वच्छताग्र्रहाची व्यवस्था केली होती. आताही त्याचधतवर साधुग्राममध्ये टेंड, रस्ते सुविधासह इतर मुलभूत सुविधा महापालिका प्रशासनाला करायच्या आहेत. बारा वर्षात 54 एकर वरील क्षेत्रात मोठया संख्येने झाडे वाढली आहेत. शिवाय मोठ-मोठे गवत तेथे वाढलेले आहे. यामध्ये सर्वाधिक काटेरी बाभळी असून त्या तोडल्या जाणार आहेत. उद्यान विभाग ठेकेदारामार्फत सदर झाडे तोडणार आहे. दरम्यान साधुग्राममध्ये साधू-महंतांची व्यवस्थेची जबाबदारी पालिका प्रशासनाकडे असून अद्याप तेथे कुठलेही काम सुरु केले नसल्याचे चित्र आहे.
चौकट...तपोवनात एकही मोठे झाड तोडले जाणार नाही. जेथे साधू-महंतासाठी सुविधा पुरवल्या जाणार आहे. तेथीलच झादे तोडली जातील. यामध्ये विशेषत: सर्वाधिक काटेरीच बाभळीचे झाडे आहेत. तर आवश्यकता वाटल्यास काही झाडांच्या फांद्या छाटल्या जातील.-विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक, मनपा
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV