
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : निशिक जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागले असल्याने तापमानात मंगळवारी 4 अंश डिग्री सेल्सियसने घट झाली आहे . तर जिल्ह्यामध्ये निफाड चे तापमान जिल्ह्यातील सर्वात कमी नोंदविण्यात आले आहे. याठिकाणी 8 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रार मध्ये सर्वात कमी तापमान हे धुळे येथे सहा अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागली असून सोमवारी 9.6 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आले होते . मंगळवारी तापमानामध्ये चार अंकी सेल्सिअसणे घट झाली असून नाशिकचे मंगळवारी किमान तापमान हे 9.2 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे . तर जिल्ह्यातील निफाड येथे 8 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे .दरम्यान वेधशाळेने दोन दिवस दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार अजूनही एक दिवस बाकी असून त्यानंतर थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर थंडी वाढल्यामुळे आता शहरातील जॉगिंग ट्रॅक बरोबरच नागरिक रस्त्यावरचे देखील गर्दी करू लागले आहे थंडीमध्ये चालण्याच्या व्यायामाला अधिक महत्त्व दिले जाते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV