डोंबिवलीतील अनमोल म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांचा भाजपात प्रवेश
मुंबई, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। डोंबिवलीचे माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे तसेच माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांन
मुंबई


मुंबई


मुंबई, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। डोंबिवलीचे माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे तसेच माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल माजी अध्यक्ष समीर चिटणीस, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राहूल दामले, मंदार हळबे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत माझे मित्र आणि हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित असलेले महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांनी पक्षात प्रवेश केला.

या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही वर्षानुवर्षे एका मित्रत्वाच्या नात्याने अतिशय ताकदीने एकत्र काम करत होतो. मविआ सरकारच्या काळात या कार्यकर्त्यांना त्याकाळात त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आगामी काळात विकासाची दृष्टी ठेवून काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मित्र म्हणून जर सगळे एकत्र राहिलो तर चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल असे वाटते, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

अनमोल म्हात्रे यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांत अश्विनी म्हात्रे, शिवसेनेचे युवा विभाग प्रमुख गजानन जोशी, विभाग अध्यक्ष ओमकार सुर्वे, माधुरी साळुंके, सुषमा सावंत, अलका कोलते, सविताताई शेलार, लक्ष्मीताई रानभरे, श्रध्दा माने यांचा समावेश आहे.

महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांत अण्णा राणे, संजय विचारे, शाखा प्रमुख सरिता शर्मा, विभाग प्रमुख संगीता अंबरे, उपविभाग प्रमुख आरती चव्हाण, अलका कुळे, छाया कांबळे, उप विभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख, विभाग प्रमुख दीपक पारेख, शाखा प्रमुख वसंत सुखदरे, सुनील पाटील, संदीप तेमुरे आदींचा समावेश आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande