
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। ‘महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा, पथदिवे, कचरा या स्वरूपाचे प्रश्न तातडीने सोडवा. गावांच्या विकासकामांसाठी निधी नसल्याने कामांवर परिणाम होतो. त्यामुळे समाविष्ट गावांतील मिळकतकरावर राज्याचा नगर विकास विभाग काम करत आहे, येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडून मिळकत कराबाबतचा निर्णय महापालिकेला कळविला जाईल,’’ असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील समस्यांचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. पवनीत कौर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु