साेलापूर जिल्ह्यात भाजपच बाहुबली'; दिले १२ उमेदवार
सोलापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एक नगरपंचायत अशा सर्व १२ नगराध्यक्ष पदासाठी भाजपने पहिल्यांदाच ''''कमळ'''' चिन्हावर उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यातील सात ठिकाणी मूळ भाजपच्या तर पाच ठिकाणी आयात उमेदवारांना संधी दिली
bjp


सोलापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एक नगरपंचायत अशा सर्व १२ नगराध्यक्ष पदासाठी भाजपने पहिल्यांदाच ''कमळ'' चिन्हावर उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यातील सात ठिकाणी मूळ भाजपच्या तर पाच ठिकाणी आयात उमेदवारांना संधी दिली आहे. अकलूजमध्ये स्वतंत्र पॅनेल उभे करत मोहिते - पाटील यांच्या साम्राज्याला थेट आव्हान दिले असून सांगोल्यात ऐनवेळी शेकापचा उमेदवारच हायजॅक करण्याच्या यशस्वी राजकीय खेळीनंतर शेकापचाही पाठिंबा मिळवला आहे. तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी दिली आहे.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार जाहीर केले. भाजप नगरपालिका निवडणुकांत पहिल्यांदाच स्वबळावर शड्डू ठोकत सर्व ठिकाणी कमळ चिन्हावर उमेदवार आखाड्यात उतरवले आहेत. स्वबळावर उमेदवार जाहीर केले असले तरी पाच नगरपालिकांत नुकतेच पक्षात आलेल्यांसह ऐनवेळी प्रवेश दिलेल्यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ घातली आहे. यात अकलूज, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या नगरपालिका तर अनगर नगरपंचायतीचा समावेश आहे. तर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, बार्शी, कुर्डुवाडी, मोहोळ व पंढरपूरमध्ये मूळ भाजपच्या व अनेक वर्षांपासून कार्यरत कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande