भरतशेठ गोगावले यांची गुगली; नगराध्यक्षांसह नऊ जणांचा शिंदे गटात प्रवेश
रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये
भरतशेठ गोगावले यांची गुगली! नगराध्यक्षांसह नऊ जणांचा शिंदे गटात प्रवेश


रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दि. 18 नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. म्हसळा नगरपंचायतीत कोट्यवधींची विकासकामे सुरू असताना अचानक झालेल्या या राजकीय हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक :

१) अस्सल असलम कादरी

२) सोमय्या कासिम आमदानी – आरोग्य सभापती

३) सईद जंजीरकर

४) जबीन नदीम दळवी

५) कमल रवींद्र जाधव

६) सारा अब्दुल कादरी

७) राखी अजय करंबे – पर्यटन समिती सभापती

८) सुफियान इकबाल हळदे

९) नसीर अब्दुल रहीमान मिठागरे. नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकांचा एकत्रित पक्षप्रवेश हा म्हसळा शहरातील राजकारणाला मोठा टर्निंग पॉइंट मानला जात असून, आगामी निवडणुकीत या घडामोडींचा थेट परिणाम दिसून येईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

नगरसेवकांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर राजकीय संतुलन बदलणार असून, मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ‘गुगली’ टाकत हा संपूर्ण डाव आपल्या बाजूने खेचल्याची चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकीत हा प्रवेश शिंदे गटाला मोठा फायदा करून देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande