बीड : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत; भाजपचे पारडे जड
बीड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पारडे जड दिसत आहे रामचंद्र निर्मळ यांचा प्रचार सुरू झाला आहे. धारूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा थेट चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र उमेदवारी अर्जासह स्पष्ट झाले आहे. भा
बीड : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत; भाजपचे पारडे जड


बीड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पारडे जड दिसत आहे रामचंद्र निर्मळ यांचा प्रचार सुरू झाला आहे. धारूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा थेट चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र उमेदवारी अर्जासह स्पष्ट झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या चारही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मैदानात उत्तरवल्याने धारूर शहरात निवडणुकीला चांगलाच रंग येणार असल्याचे दिसत आहे.

चार पक्ष, चार वेगवेगळे चेहरे आणि धारूरच्या राजकारणात मोठी वळण देणारी ही निवडणूक अशी ही चौरंगी लढत आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शहरात गाठीभेटी, कॉर्नर सभा, रस्ते-गल्ल्यांमध्ये धावपळ आणि घोषणांची मालिका असा उत्साह ओसंडून वाहणार आहे

भाजपकडून रामचंद्र उर्फ राजाभाऊ निर्मळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अर्जुन गायकवाड 'तुतारी' शिवसेना (शिंदे गट) चे सुरेश गवळी असे उमेदवार आहेत. आता या लढतीत नेमका 'धारूरकरांचा कौल' कुणाला मिळतो हे विशेष ठरेल.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने बालाजी जाधव यांच्यावर विश्वास टाकला आहे. गत निवडणुकीत ते भाजपकडून नगरसेवक होते. राजकीय स्थलांतर करून त्यांनी आता शरद पवार गटाला थेट टक्कर देत अजित पवार गटाचा चेहरा म्हणून बाजी लावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande