महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे पाच दिवस निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले
विभागीय अधिकारी सुदाम थोटे


छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे पाच दिवस निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणात तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चे प्रकार, त्यामधील उद्योग संधी, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पॅकिंग, पिलिंग मशीन, प्रोसेस लाईन, सेटअप मशीन सिलेक्शन, कच्चा माल, बाजारपेठ, निर्यात क्षेत्रातील उद्योग संधी, मालाची क्वालिटी टेस्ट याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले-लसूण पावडर, कढीपत्ता, पुदीना पावडर, बटाटा पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्लेक्स तयार करणे यांचा समावेश आहे. या संधीचा स्वतःचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे. प्रवेशासाठी व अधिक माहिती संपर्कः- श्रीमती आशा कुरवडे :७८८८०७०४१९, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, विभागीय कार्यालय, A-38, MIDC परिसर, रेल्वे स्टेशन रोड,छत्रपती संभाजीनगर.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande