
पेठ, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
- वन विकास महामंडळाच्या पेठ युनिटचे फिरते पथक झरी, आंबा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी यांच्या गस्तीवेळी पहाटेच्या सुमारास झरी बेजावड जंगल परिसरात काही संशयीत आढळून आले.
त्यांना विचारणा करता ते पळून जाण्याच्या मार्गावर असतानाच वन कर्मचाऱ्यांनी त्याना ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यांनी या जंगलातील सागवान वृक्षतोड करून चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने व दोन वन्यजीव घोरपड जिवंत शिकार करून नेताना सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. मात्र अन्य पसार झाले आहेत. या कारवाईत सागाचे सहा नग ०.६५३ घन मीटर, दोन जीवंत वन्यजीव घोरपड, महिंद्रा पिकअप जी जे ०५ बी एस ४९४०, होंडाची दुचाकी जीजे १५ ईजे ५०१७व ६ आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. सर्व आरोपी गुजरात राज्यातील बलसाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांची नावे भरत शिवा ठाडर, पिंट्या ठाडर, निलेश जोगार, निलेश दोडका, धावळु माडे, सुरेश दोडका अशी आहेत.
ही कारवाई विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी, प्रवीण डमाळे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, वनपरिक्षेत्र अधिकारी भरत तायडे, वनपाल चेतन चौरे, नितीन पवार, वनरक्षक कुंदन राठोड, गणेश मस्के, नावेद सय्यद, मंगेश वाघ, चालक देविदास बोंबले, पोलीस शिपाई कैलास पवार आदींनी कामगिरी बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV