भारताने रशियात दोन नवीन महावाणिज्य दूतावास केले सुरू
नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताने रशियासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारताने रशियातील येकातेरिनबर्ग आणि काझान येथे दोन नवीन महावाणिज्य दूतावासांचे उद्घाटन केले. या प्रसंगी परराष्ट्र मंत्री डॉ.
भारताने रशियात दोन नवीन महावाणिज्य दूतावास केले सुरू


नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताने रशियासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारताने रशियातील येकातेरिनबर्ग आणि काझान येथे दोन नवीन महावाणिज्य दूतावासांचे उद्घाटन केले. या प्रसंगी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, “हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आम्ही या देशात आणखी दोन महावाणिज्य दूतावास जोडत आहोत.”

जयशंकर यांनी सांगितले की हे दूतावास फक्त दोन्ही देशांमधील संबंध दृढ करणार नाहीत, तर 2030 पर्यंत भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासही मदत करतील. सध्या हा व्यापार 68.7 अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी कार्यक्रमात सहभागी लोकांना सांगितले,“गेल्या काही महिन्यांपासून या दूतावासांच्या स्थापनेवर सतत काम सुरू होते. औद्योगिक महत्त्वामुळे येकातेरिनबर्गला अनेकदा रशियाची तिसरी राजधानी म्हटले जाते आणि ते सायबेरियाचे प्रवेशद्वार मानले जाते. जड अभियांत्रिकी, रत्न कटाई, संरक्षण उत्पादन, धातुकर्म, अणुइंधन, रसायन आणि वैद्यकीय उपकरणांसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश रशियातील प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच ‘इन्नोप्रोम’ची मेजवानीही करतो.”

परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले की दूतावास उघडल्यामुळे भारतीय आणि रशियन उद्योगांमधील तांत्रिक, वैज्ञानिक, आर्थिक आणि व्यापारी सहकार्य अधिक सक्षम आणि मजबूत होईल. त्यांनी पुढे सांगितले, “काझान तेल उत्पादन-शुद्धीकरण, खत उद्योग, ऑटोमोबाईल, संरक्षण उत्पादन, औषधनिर्मिती आणि विद्युत उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे.”

जयशंकर म्हणाले की दोन नवीन दूतावास उघडल्यामुळे भारत-रशिया संबंध निश्चितच आणखी दृढ होतील आणि हे आपल्या संबंधांच्या एका नव्या टप्प्याची सुरुवात ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की रशियात विविध भारतीय राज्यांतून आलेल्या मोठ्या प्रमाणात प्रवासी समुदायाची उपस्थिती आहे आणि आज 30,000 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

त्यांनी सांगितले, “यापैकी सुमारे 7,000 विद्यार्थी काझान महावाणिज्य दूतावासाच्या कार्यक्षेत्रात आणि 3,000 विद्यार्थी येकातेरिनबर्गच्या कार्यक्षेत्रात राहतात.”

महावाणिज्य दूतावासांचे उद्घाटन करण्यापूर्वी जयशंकर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. ते शांघाय सहकार्य संघटना (SCO) बैठकीसाठी मॉस्को येथे आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande